
अलिबाग : प्रतिनिधी
अभिवाचन आनंद आणि आभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पीएनपी नाट्यगृहात एकल व सांघिक अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वयाच्या 13 वर्षापासून ते अगदी 65 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांच्या अभिवाचनामुळे अलिबागकरांना अभिवाचन मेजवानीचा आस्वाद घेता आला. या अभिवाचन स्पर्धेची संकल्पना श्रद्धा पोखरणकर यांची होती. अलिबाग तालुका तसेच पुणे येथील स्पर्धक सहभागी झाले होते. सुएसोच्या कुरूळ येथील सृजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ज्येष्ठ रंगकर्मी सागर नार्वेकर, नागाव शाळेच्या मुख्याध्यापिका भावेश्री वाळंज आणि अभिवाचक स्वप्नील फडके यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. हिमालय चोरघे, आनंद पाटील, अश्रिता बारसे, प्रथमेश पाटील, अक्षता कुळकर्णी-गायकवाड, मनीष अनसुरकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल एकल विभाग : प्रथम आकाश थिटे, द्वितीय वसुंधरा पोखरणकर, तृतीय मंगला राजे, उत्तेजनार्थ अवंती वर्तक, उत्तेजनार्थ प्रांजली जाधव. सांघिक विभाग : प्रथम क्रमांक अॅडिक्टेड थिएटर, खास वाचक ऋतुजा सरनाईक, उत्तेजनार्थ अनंत थिएटर, उत्तेजनार्थ वाचू आनंदे.
RamPrahar – The Panvel Daily Paper