Breaking News

अलिबागमध्ये भाजपचा विजयी जल्लोष

अलिबाग : प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयासमोर येथे शनिवारी (दि. 2) विजयी जल्लोष करण्यात आला.

भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, सतीश लेले, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत यांच्यासह तालुक्यातील

सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी, सर्व मोर्चा, सेल, प्रकोष्ठचे पदाधिकारी आणि सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष या वेळी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply