अलिबाग ः प्रतिनिधी
मुलाने आपल्या आईला जाळल्याने यात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावात घडली. चांगुणा नामदेव खोत (65) असे मृत्यू पावलेल्या आईचे नाव असून आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (27) याला पोलिसांनी अटक केली आहे.
जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. या वेळी जयेशने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात चांगुणा खोत जखमी झाल्या. नंतर जयेशने जखमी आईला मोकळ्या जागेत नेले व तिच्यावर पालापाचोळा टाकून तिला पेटवून दिले.
याबाबत गावातील लोकांना महिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले तसेच जखमी चांगुणा खोत यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी जयेश खोत याला पोलिसांनी अटक केली आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper