अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्षा राजेंद्र साखरकर (अलिबाग), सपना अमोल जाधव (पेण), स्नेहा गणेश कोदू, (अलिबाग), श्रुती संतोष अडीत (कर्जत), रेखा प्रभाकर मोरे (अलिबाग) यांची यंदाच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजात आदर्शवत काम करणार्या आणि प्रसिध्दीच्या झोतात नसलेल्या महिलांना अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे दरवर्षी ’तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 7 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता अलिबाग श्रीबाग क्र.2 येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयात पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper