Breaking News

अवैध दारूविक्री करणार्यांना अटक

पेण, माणगाव ः प्रतिनिधी – विनापरवाना दारूविक्री करणार्‍या पेण आणि माणगावमधील दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पेण तालुक्यातील वाशी येथे कोणत्याही प्रकारचा विदेशी दारूविक्रीचा परवाना नसताना एकूण 9970 रुपये किमतीची विदेशी दारू बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगून विक्री करताना आरोपी आढळून आला. त्याच्यावर वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे अवैधपणे दारूची विक्री करणार्‍या ओंकार शांताराम तवटे (रा. लोणेरेवाडी) याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. गावडे चाळीच्या मागे धाड टाकत तेथून पोलीस पथकाने 14 हजार 800 रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply