Breaking News

अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण ; तत्कालीन तपास अधिकार्याच्या नियुक्तीसाठी याचिका

पनवेल ः बातमीदार

अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी सरकारी वकिलांना नवी मुंबई पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात नसल्याचा आरोप अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिंद्रे यांनी केला आहे. यासाठी तत्कालीन तपास अधिकारी संगीत शिंदे अल्फान्सो यांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालय 2018/ 2019ने रिटपिटीशन दाखल केली आहे. त्याची सुनावणी 29 जुलै रोजी रणजित मोरे यांच्या कोर्टात होणार आहे. अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचा तपास कळंबोली पोलीस ठाणे आणि नवी मुंबई क्राईम ब्रँच व्यतिरिक्त अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. तपासाचे नियंत्रण  संगीत शिंदे अल्फान्सो यांच्याकडे सोपवण्यात यावे, ही मूळ मागणी करण्यात आली आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply