मुरूड ः प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरूड एकवीरा भोई मंडळ कोळीवाडा यांच्याकडून परिसरातील मच्छी मार्केटमध्ये मच्छीविक्री करणार्या महिला व खरेदीसाठी येणार्या नागरिकांचे सॅनिटायझरने हात धुवून मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी पांडुरग आरेकर, दिनेश बोरजी, प्रल्हाद गोंजी, जितेंद्र कासेकर, नंदू केंडू, नरेंद्र सावाई, श्रीकांत सुर्वे, कीर्ती शहा, मनोहर बैले, मनोहर मकू आदींच्या हस्तेही मास्कवाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. वस्तू खरेदीसाठी गर्दी करू नका, असे आव्हान समाजसेवक दिनेश बोरजी यांनी या वेळी केले.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper