चिरनेर : प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे उरण, पनवेल, रायगड, नवी मुंबई परिसरात पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे व आपल्या साहित्यिक, तसेच समाजसेवेतून जनतेला सहकार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांची आगरी साहित्य विकास मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी वाशी (नवी मुंबई) येथील गुरव हॉलमध्ये सदर नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्र देताना धनंजय गोंधळी हे मंडळाच्या कार्यासाठी पुढे राहून सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व त्यांच्या निवडीबद्दल विशेष आभार मानले. या वेळी कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष अॅड. चंद्रकांत मढवी, उपाध्यक्षा दमयंती भोईर, कोषाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे यांनी श्री. गोंधळींच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper