Breaking News

आता संपूर्ण लसीकरणासाठी नियोजन; नवी मुंबई मनपाचे 100 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्याकडे लक्ष

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

शहरातील 100 टक्के नागरिकांना पहिली मात्रा देणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. त्यामुळे महापालिकेने 100 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरी आरोग्य केंद्रांकडे उपलब्ध असलेल्या दैनंदिन लसीकरणाच्या यादीनुसार 84 दिवस आधी कोविशिल्ड तसेच 28 दिवस आधी कोवॅक्सिन लसीची पहिली मात्रा घेणार्‍या व्यक्तींना दुसरी मात्रा घेण्याचा विहित कालावधी पूर्ण झाल्याचे सांगितले जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या कोरोना कॉल सेंटरकडे पहिली मात्रा झालेल्या नागरिकांची यादी देण्यात आली असून कॉल सेंटरमार्फतही नागरिकांना सूचना करण्यात येणार आहे. दिवसाला 10 हजार नागरिकांना दूरध्वनी करून दुसरी मात्रा घेण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. आत्तापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खासगी रुग्णालये याठिकाणी 11 लाख 17 हजार 685 नागरिकांनी कोरोना लशीची पहिली मात्रा घेतली. पाच लाख 97 हजार 653 नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली. नागरिकांनी दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी पूर्ण झाला की, लगेच ती घ्यावी, असे आवाहन वेगवगेळ्या माध्यमांतून पालिका करत आहे. आता शहरातील रुग्णसंख्या कमी होत चालली असली, तरी तिसरी लाट येण्याचा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल तर लसीकरणाला महत्त्व द्यावेच लागेल. त्यामुळे नवी मुंबईला लस संरक्षित करण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

दुसर्‍या डोससाठी पालिकेचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दैनंदिन लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले जात असून दुसर्‍या दिवशीच्या लसीकरणाची माहिती आदल्या दिवशी संध्याकाळी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल माध्यमांवरून तसेच पाालर्लेींळवलरीश.लेा या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी पहिली मात्रा घेऊन ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यावर लगेच नजीकच्या महानगरपालिका लसीकरण केंद्रावर जाऊन दुसरी मात्रा घ्यावी व संपूर्ण लस संरक्षित व्हावे. जरी खासगी रुग्णालयात पहिली मात्रा घेतली असली, तरी दुसरी मात्रा पालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर विनामूल्य उपलब्ध आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply