Breaking News

आता सुटीच्या दिवशीही मिळणार कोरोना लस!

केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवनवीन कृती कार्यक्रम हाती घेतला जात असून, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटच्या त्रिसूत्रीनंतर लसीकरणावर जोर दिला जात आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रांवर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोना बळावू लागला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात संक्रमणाचा वेग वाढल्याने केंद्राने काही निर्णयही घेतले असून, त्यात लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे तिथे दोन आठवड्यांत लसीकरण करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आलेल्या आहेत.
निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी (दि. 1) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यानुसार सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रांवर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply