अलिबाग : प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिन शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. आलिबाग शहरात आदिवासींनी मिरवणूक काढली होती. पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिला व पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन, तसेच काठ्यांवर चालून रॅलीत सहभाग घेतला होता. पारंपरिक वेशामधील आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य करीत होते. महिला डोक्यात रान फुले घालून गाणी बोलत संगीतावर ठेका धरून नाचत होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper