रसायनी : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील आपटा गावात स्मशानभूमीजवळील मोकळ्या शेडमध्ये जुगार खेळणार्या 10 जणांना रसायनी पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपटा गावात बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळला जात होता. रसायनी पोलिसांच्या पथकाने तेथे धाड टाकली. या वेळी घटनास्थळावरून रोख रक्कम, रिक्षा, मोटरसायकल इत्यादी मिळून एक लाख 67 हजार 960 एवढा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे शब्बीर मोहम्मद सईद मुल्ला, हरिश जोमा सावंत, कुरेश शहाबुद्दीन सिद्धीकी, रमेश भाऊ सावंत, विजय मुकुंद भाटे, शंकर भिमराव राठोड, प्रदीप चिंतामण कांबळे, सचिन रमेश सनगरे, दत्ता पांडुरंग वाघे व जनार्दन जोमा सावंत यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper