उरण ः वार्ताहर
उरण शहर आणि परिसरात वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे गावांमध्ये बदल होत असले तरी आपण आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 8) उरण येथे केले. ते ज्येष्ठ नागरिक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने रविवारी उरण मुळेखंड येथील ज्येेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात मुळेखंड, तेलीपाडा, कोळीवाडा, कुंभारवाडा व परिसर ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनी भविष्यात ज्येष्ठ नागरिक मंडळाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण तयार असल्याचे आश्वासन दिले.
या वेळी दहावी, बारावी तसेच वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आला, तर मुळेखंड गावची कन्या डॉ. मानसी अनिल पाटील ही बीएएमएसचे पदवी शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आणि वृक्षारोपणही करण्यात आले.
कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते रवी भोईर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, माजी जि.प.सदस्य जीवन गावंड, चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, सदस्य उज्वला म्हात्रे, मुळेखंड गाव अध्यक्ष हितेश म्हात्रे, संजय होळकर यांच्यासह मुळेखंड, तेलीपाडा, कोळीवाडा, कुंभारवाडा व परिसर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, कार्याध्यक्ष अनंत पाटील, सचिव परशुराम पाटील, उपाध्यक्ष अंकुश म्हात्रे, खजिनदार ईश्वर म्हात्रे, सहसचिव सुभाष गुरव, सहखजिनदार गोपीनाथ मंडेलकर, उरण तालुका भाजप उपाध्यक्ष मुकुंद गावंड, सरचिटणीस सुनील पाटील, ज्येष्ठ नागरिक मंडळ सदस्य कमलाकर म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, रमेश म्हात्रे, पंढरीनाथ मांडेलकर, नामदेव पाटील, सरिता म्हात्रे, नथुराम म्हात्रे, केशव म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper