पनवेल : रामप्रहर वृत्त
शिव प्रबळ सामाजिक विकाससंस्था आणि कर्तेश्वर क्रिकेट संघ व जय हनुमान क्रिकेट संघातर्फे आमदार प्रशांत ठाकूर चषक 2020 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल तालुक्यातील भिंगार येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे
उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) झाले.
उद्घाटन सोहळ्यास आयोजक माजी सरपंच सुभाष पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तसेच धर्मेंद्र घोगरे, संदेश पाटील, अनिल फडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मंडळाचे सदस्य आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …
RamPrahar – The Panvel Daily Paper