पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलमधील आई मरिआई मित्र मंडळ रोहिदासवाड्याच्या वतीने आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि. 15) करण्यात आले होते. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
एमएसईबी कार्यालयाच्या मागे असलेल्या मैदानात या 15 आणि 16 फेबु्रवारी या कालावधीत हे अंडरआर्म क्रिकेट सामने झाले. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक राजू सोनी, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, भाजप प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, विनायक मुंबईकर, सुलोचना कल्याणकर, निलेश पाटील, समीप मोहोकर, उमेश भोस्कर, यशवंत जाधव यांच्यासह क्रीडाप्रेमी, खेळाडू उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper