पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने जॉब फेअरच आयोजन रविवारी करण्यात आले होते. प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या जॉब फेअरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते
करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाकडे पाऊल टाकत आहे. या प्रगतीमध्ये त्या त्या परिसरातील स्थानिकांना संधी मिळाली पाहिजे तर त्या माध्यमातून त्या परिसराचा विकास होत असतो. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांनी हे जॉब फेअर आयोजित याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो, असे मत जॉब फेअरवेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माझी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, गणेश पाटील, सुनील बहिरा, रवींद्र भगत, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहेकर, सारिका भगत, रेणुका मोहकर, सरस्वती काथारा, कविता ठाकूर, संतोष पाटील, अजित अडसुळे, पवन सोनी, मंगेश अपराज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper