Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते फिटनेस सेंटरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पुढच्या पिढ्यांना निरोगी जीवन द्यायचे असेल, तर त्यासाठी आपण फिट असणे आवश्यक आहे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये फिटनेस सेंटच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.
आरोग्य आणि निरोगी जीवनसाठी समर्पित असलेले अधिराज वेलनेस आणि फिटनेस सेंटर सुलभा शेळके यांनी कळंबोली सेक्टर 11मध्ये नव्याने सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.4) झाले. या वेळी त्यांनी शेळके व त्यांच्या सहाकार्‍यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाळघरे, भाजप जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, माजी नगरसेवक विजय खानावकर, राजेंद्र शर्मा, रवींद्र भगत, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, डॉ. मारुती खामकर, अनिल कदम, सरस्वती काथारा, सुलभा खेडकर, कल्पना मोटे, संतोष सानप, मुकुंद पाटील, प्रकाश घोडके, कृष्णा पाटील, नंदकुमार शेळके आदी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply