महाड ः प्रतिनिधी
भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 28) सकाळी महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजप कार्यालयाला भेट देत उमेदवारांना मार्गदर्शन केले तसेच प्रभाग क्रमांक 7, 8 व 9मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.
महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली असून या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर महाड येथे आले होते. या दौर्यादरम्यान त्यांनी चवदार तळे येथील भाजप कार्यालयाला भेट देऊन उमेदवारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया आहे. निवडणुकीनंतर नगरपालिकेत काम करीत असताना निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी येथे आपला पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावे तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्या व शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे.
यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 6मधील प्रभात कॉलनी तसेच क्रमांक 7 व 8 येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि भविष्यातील महाड शहराची भाजपची विकासरचना समजावून सांगून युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या वेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य बिपीन महामुणकर, राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमोती, महाड दक्षिण मंडळ अध्यक्ष निलेश तळवलकर, सुरज बामणे, सुमित पवार, श्रद्धा जोशी, सुनील सोंडकर, संकेत पोरे, संदीप ठोंबरे, शरद, कुद्रीमोती, नमिता जोशी, अक्षय ताडफळे, सुनील सोणकर, शिवाजी दरेकर, आदित्य भाटे, अमोल सुंभे, सुमित पवार, नाना पोरे, दीक्षा शिंदे, राजा नातेकर, नाना महाले, श्रीकांत सहस्रबुद्धे, युवराज मुंडे, शशांक महामुणकर, अपूर्वा अवसरे, समृद्धी खोडके, प्रिया खोडके, सोरटताई, माधव रानडे, स्नेहल महामुणकर, बंटी देशमुख आदी उपस्थित होते.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper