पनवेल : रामप्रहर वृत्त
एड्सची लागण झालेल्या व्यक्तीलाही समाजामध्ये जगण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी एड्स निर्मूलन सप्ताहाच्या निमित्ताने पनवेलमध्ये आयोजीत केलेल्या रॅलीच्या शुभारंभावेळी केले.
कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेच्या लाईफ लाईन स्कूल ऑफ नर्सिंग, सुशीला नर्सिंग कॉलेज, डॉक्टर जयश्री पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल एड्स निर्मूलन सप्ताहाच्या निमित्ताने पनवेल येथे भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला. या रॅलीला लाईफ लाईन हॉस्पिटलपासून सुरुवात झाली असून पुढे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग-लाईन आळी, जयभारत नाका मार्गे उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचली, तेथे पथनाट्य सादर झाले. त्यानंतर रॅली पनवेल महापालिका, सावरकर चौक, यूपीएससी गावदेवी मंदिरामार्गे लाईफ लाईन हॉस्पिटल येथे पोहोचून तेथे समारोप करण्यात आला. यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन एड्स आजाराबद्दल जनजागृती केली.
या कार्यक्रमाला लाईफ लाईन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रकाश पाटील, डायरेक्टर्स डॉ.जयश्री पाटील, डॉ.अभितेज म्हस्के, डॉ.केतकी पाटील-म्हस्के, डॉ.अजिंक्य पाटील, डॉ.जान्हवी पाटील, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचे अध्यक्ष निलेश पोटे, सेक्रेटरी हितेश रजपूत, पूर्व अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे, कल्पेश परमार, चारुदत्त भगत, संजय जैन, तुषार तटकरी, कल्पना नागांवकर, बसंती जैन, दिपाली व्होरा, भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गौरी शिवानी, महेंद्र उरणकर, राजेश भूषण, प्राचार्या डॉ. सुपर्णा सुनील पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. ईटकरे, डॉ.राठोड, समुपदेशक विकास कोमपले, यांच्यासह लाईफ लाईन हॉस्पिटल आणि उपजिल्हा रुग्नालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper