कळंबोली : आमदार प्रशांत ठाकूर व कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने बुधवारी (दि. 16) कळंबोली वसाहतीतील सेक्टर 14 ते 15 येथील अंतर्गत रस्ते व गटराचे काम सुरू करण्यात आले. परिसरातील रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहे.
कळंबोली सेक्टर 14 व 15 मधील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जे-जा करताना अनेक अडचणी येत होत्या. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील रहिवाशांनी कळंबोली शहर भाजप अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. रस्ता दुरूस्तीसाठी रविशेठ पाटील व नगरसेवकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश येेवून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने व नगरसेवकांनी केलेल्या मागणीला यश येवून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper