Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे

शनिवारी मान्यवरांच्या हस्ते होणार शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक येथे वैद्यकीय सामुग्री व रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत मोहपे येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शनिवारी (दि. 15) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी 11 वाजता मोहपे येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ होणार आहे, तर सकाळी 11 वाजता चौक ग्रामीण रुग्णालयात ड्युरा सिलेंडर, जम्बो सिलेंडर, जनरेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, सेल काऊंटर मशीन, या 33 लाख 50 हजार रुपयांच्या वैद्यकीय सामुग्रीचे, तसेच चौक ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply