Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांचा गोरगरिबांना मदतीचा हात

पेण : प्रतिनिधी
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने रोजंदारी काम करून पैसे कमाविणार्‍यांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 10) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
पेणमधील रामवाडी येथील अनेक कुटुंबांना अन्नधान्य व वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती निवृती पाटील, भाजप तालुका अध्यक्ष
श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, प्रभाकर म्हात्रे, माजी नगरसेवक प्रकाश रामाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply