Breaking News

आयआयएचटी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

ना. रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
खारघर आणि वाशी येथील आयआयएचटी संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त खारघर सेक्टर 3मधील एसएन पार्क येथे संस्थेच्या दशकपूर्ती वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 14) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आयआयएचटी खारघर आणि वाशी या संस्थेने गेल्या 10 वर्षांत येथील 10हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले असून पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून दिले आहे. या संस्थेत प्रशिक्षणासह विद्यार्थ्यांना नोकरीची हमीदेखील देण्यात येते. अशा या संस्थेने यशस्वी दशकपूर्ती केली आहे. त्यामुळे वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या दिनाचे औचित्य साधून संस्थेचे ऑल इंडिया ऑफ इंटीग्रेटेड टेक्निकल स्टडीसझ् अर्थात एआयआयआयटीएस हे नामकरण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. त्यांनी संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समीर कदम, गीता चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply