मुंबई : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेनंतर आता क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आगामी आयपीएलचे. गतवर्षी कोरोनामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे 13वे सत्र यूएईमध्ये आयोजित झाले. यंदा आयपीएलचे आगामी 14वे सत्र भारतामध्येच आयोजित करण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका पाहता यंदाचे सर्व सामने बीसीसीआयने मुंबई आणि अहमदाबाद येथेच खेळविण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साखळी सामन्यांचे आयोजन मुंबईतील चार स्टेडियममध्ये करण्यात येऊ शकते, तसेच बादफेरीसह अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबाद येथील नव्या मोटेरा स्टेडियममध्ये करण्यात येईल. यंदाच्या आयपीएलला एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून किंवा त्यानंतर सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने यंदाची आयपीएल केवळ ठरावीक स्टेडियममध्येच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम, डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि रिलायन्स क्रिकेट स्टेडियम अशी चार स्टेडियम्स आहेत, तसेच सध्या जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला आलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये बाद फेरी व अंतिम सामना खेळविण्याचा विचार सुरू आहे.
स्पर्धा एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून?
आयपीएल आयोजनाबाबत माहिती देताना सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, सध्या मुंबईतील चार स्टेडियमवर आयपीएल सामने आयोजनाची चर्चा सुरू आहे. यामध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न, डॉ. डी. वाय. पाटील आणि रिलायन्स या चार स्टेडियम्सचा समावेश आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचा विचार होऊ शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून, यंदाच्या आयपीएलला एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून किंवा त्यानंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper