‘आरटीआयएससी’च्या रक्षा कंदसामीला राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त

उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये प्रशिक्षण घेणारी बॅडमिंटनपटू रक्षा कंदसामी हिने ऑल इंडिया सब ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. ही स्पर्धा नुकतीच बिहारमधील भागलपूर येथे झाली.

12 वर्षीय रक्षा ही नेरूळ येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. तिने महाराष्ट्राकडून खेळताना ऑल इंडिया सब ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 13 वर्षांखालील गटात कांस्यपदकाला गवसणी घातली. आरटीआयएससीतील दीपांकर बॅडमिंटन असोसिएशनमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या रक्षाचे अभिनंदन होत आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply