अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात कुठेही राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘आरडीसीए’च्या पदाधिकार्यांना दिले आहे.
आरडीसीएला स्वतःचे मैदान नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्या विविध वयोगटातील मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धा, सराव शिबिरे यासाठी जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडील किंवा खासगी क्लबकडील मैदानांवर अवलंबून रहावे लागते व त्याची उपलब्धता ही काही मर्यादित दिवसांसाठी होते.
या पार्श्वभूमीवर आरडीसीएने त्यांना स्वतःच्या हक्काचे मैदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सहकार्यांनी भेट घेतली. आरडीसीएच्या प्रस्तावावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात येत्या आठवड्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आपण भेट घेऊन त्यांना आरसीडीएच्या वतीने निवेदन प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरडीसीएला स्वतःच्या हक्काचे मैदान मिळाल्यास जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper