आरपीएलसाठी खेळाडूंचे ऑक्शन

परेश ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेच्या सन्मानचिन्हाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
बहुचर्चित आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या दुसर्‍या हंगामासाठी खेळाडूंची ऑक्शन प्रक्रिया सोमवारी (दि. 19) झाली. या वेळी स्पर्धेच्या सन्मानचिन्हाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक संघाच्या कर्णधाराला टी-शर्ट देण्यात आले.
खांदा कॉलनीतील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये झालेल्या या ऑक्शन सोहळ्याला डॉ. अमोद दिवेकर, सुबोध जोशी, गणेश कुडाळे, प्रमोद पालीवल, अविनाश बारणे, प्रशांत तुपे, सिकंदर पाटील, पंकज पाटील, देवेंद्र चौधरी, प्रितम कैय्या, डॉ. संतोष जाधव आदी उपस्थित होते.
ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या रोटरी प्रीमियर लीगमध्ये सहा संघ सहभागी झाले असून ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानावर खेळली जाणार आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply