Breaking News

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : आपल्या गायनाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या प्रख्यात गायिका आशा भोसले यांना राज्यातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीची बैठक गुरुवारी (दि. 25) झाली. या बैठकीत भोसले यांना 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ यांसारखी आशा भोसले यांचा स्वरसाज लाभलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. भोसले यांना 2000-01मध्ये चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर केंद्र सरकारने 2008मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर देऊन गौरविले होते. 

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply