पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या आशा सेविकांना उल्हासनगर
महापालिकेप्रमाणे मानधन वाढवून आणि वेळच्या वेळी देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून डॉक्टर आणि आरोग्यसेवकांच्या बरोबरीने आशा सेविका काम करीत आहेत. घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, आजारी नागरिकांची माहिती गोळा करून महापालिकेला देणे आदी कामे आशा सेविका धोका पत्करून करीत आहेत, पण त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. त्यांना मिळणारे एक हजार रुपये मानधनही वेळेवर दिले जात नाही. उल्हासनगर महापालिकेने आशा सेविकांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे मानधन 10 हजार रुपये केले आहे. त्या अनुषंगाने नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र देऊन आशा सेविकांचे मानधन 10 हजार रुपयांपर्यंत वाढवावे आणि ते वेळच्या वेळी देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper