Breaking News

आ. गणेश नाईकांच्या इशार्याने पालिकेला जाग

बेलापूरच्या होल्डिंग पाँड स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू

नवी मुंबई : बातमीदार

बेलापूर येथील होल्डिंग पाँडच्या स्वच्छतेला सुरुवात केली नाही तर स्वतः पोकलेन घेऊन हा होल्डिंग पाँड साफ करण्याचा इशारा  आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. यानंतर हादरलेल्या पालिका प्रशासनाने होल्डिंग पाँड्स सफाईच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

या भागातील माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी मागील काही वर्षे सातत्याने हा होल्डिंग पाँड साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. ढिम्म प्रशासनाच्या संथ  कार्यवाहीमुळे  उद्विग्न झालेल्या डॉक्टर नाथ यांनी याप्रश्नी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, शुभांगी पाटील, डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, राजश्री कातकरी, जगन्नाथ कोळी, रमेश शेट्टी, जयदेव ठाकूर, मोउजी पटेल, तनसुख जैन, हस्तीमल जैन, करसन पटेल, नानजी पटेल, प्रभु पटेल, हेमंत काटकर, सुनील महामुलकर, बाबू भाई जैन, अनिल वेरट, गोविंद प्रेमजी पटेल, सुदर्शन डोंगरे, तसेच पालिका शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, उपअभियंता अजय पाटील आदी उपस्थित होते.

लोकनेते आमदार नाईक यांनी मंगळवारी या बेलापूरच्या होल्डिंग पाँडची पाहणी केली. मागील वर्षी बेलापूर भागात सुमारे पाचशे घरांमध्ये आणि चारशे दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान स्थानिकांचे झाले होते. या पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी लोकनेते नाईक यांनी पालिका प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता. पालिका प्रशासनाने होल्डिंग पाँडच्या साफसफाईच्या दृष्टीने तातडीच्या उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्याची पाहणी लोकनेते नाईक यांनी केली. महापालिकेचे नगर अभियंता संजय देसाई यांनी या विषयी त्यांना माहिती दिली.

पावसाचे पाणी साचू नये  यासाठी 1000 हॉर्स पॉवरचे 2 पंप लावण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेली पाइपलाइन साफ करून घेण्यात आली आहे. दोन पाइपलाइन बदलण्यात आल्या आहेत. नाल्याची रुंदी वाढवण्यात आली आहे. अशी माहिती देतानाच संजय देसाई यांनी होल्डिंग पाँड सफाईबाबत एमसीझेडएमइकडे प्रस्ताव पाठवला असून तो मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सल्लागाराची नेमणूक झाली आहे. पुढील वर्षी संपूर्ण गाळ काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

डॉक्टर नाथ यांनी लोकांच्या भावना त्यांना होणारा त्रास प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आत्महत्येचा इशारा दिला होता. डॉक्टर नाथ हे जनसामान्यांचे प्रतिनिधी असून नागरिकांना होणारा त्रास हा आपला त्रास आहे असे ते समजतात. डॉ. नाथ हे हाडाचे समाजसेवक असून या प्रश्नी राजकारण करण्याचा संबंध येत नाही त्यांच्या कार्याबद्दल कोणाच्या प्रमाणपत्राच्या शिफारशींची गरज नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply