गावसकरांची भविष्यवाणी
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संघाकडे वर्ल्ड कप जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतासह अन्य देशांच्या काही माजी खेळाडूंनीही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ वर्ल्ड कप उंचावेल, असे मत व्यक्त केले आहे, मात्र भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांना तसे वाटत नाही. त्यांच्या मते यजमान इंग्लंड संघ हा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
‘2011 आणि 2015च्या वर्ल्ड कपचा इतिहास पाहिल्यास यजमान देशांनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे इंग्लंडला 2019मध्ये जेतेपदाची अधिक संधी आहे. घरच्या वातावरणाची त्यांना योग्य जाण असल्याने त्यांचे पारडे जड आहे,’ असे गावसकर म्हणाले.
30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 30 जूनला सामना होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper