Breaking News

इन्स्ट्राग्रामवरून अश्लील संदेश पाठवून विनयभंग

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील बापदेववाडीमधील फिर्यादी यांच्या इन्स्ट्राग्राम सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील संदेश पाठविल्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी (रा. बापदेववाडी. ता. पेण) यांचे इन्स्ट्राग्राम सोशल मिडियावर अकाउंट आहे. सदर अकाऊंट ऑक्टोबर 2020 पासून फिर्यादी वापरत नव्हत्या. 13 जानेवारी रोजी रात्री 9.30च्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांचा इन्स्ट्राग्राम सोशल मीडियावरील अकाउंट चालू केला असता, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर अश्लील मेसेज पाठवून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 345 ड, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (2008 चे सुधारणेसह) 67 चे कलम 67 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार करीत आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply