Breaking News

उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांचा विलगीकरण कक्ष

जेएसडब्ल्यू कंपनीचा पुढाकार

पेण ः प्रतिनिधी – पनवेलमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे हाकेवर असलेल्या पेणमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पेणमध्ये गोरगरीब जनतेसाठी सर्व सुविधा पुरविणारे एकही रुग्णालय नसल्याची खंत होती. त्यासाठी पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने पुढाकार घेऊन पेणमधील उपजिल्हा रुग्णालय कोरोनाचा सामना करण्यासाठी सोयीसुविधांनी सज्ज केले आहे, अशी माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर आत्माराम बेटकेकर यांनी दिली.

पेणमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करणारे रुग्णालय असावे ही गरज ओळखून उपजिल्हा रुग्णालय पेण येथे 50 खाटांचा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या वतीने दोन व्हेंटिलेटर व विलगीकरण कक्ष असे एकूण 65 लाख रुपये खर्च करून पेण उपजिल्हा रुग्णालय सर्व सोयीसुविधांनी सज्ज केले आहे. या कामामुळे जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथे स्वतंत्र डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात येणार आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply