Breaking News

उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीबाबत शिवसेना युतीचा धर्म विसरले भाजप शहरप्रमुख श्रीकांत पुरी यांचा आरोप

खोपोली : प्रतिनिधी

उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना भाजपला विश्वासात घेत नसल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी केला आहे.

अडीच वर्षांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपची मनधरणी करणारे शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर आगामी रणनीतीबाबत अद्याप भाजपला विश्वासात घेत नाही, असा आरोप पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या वेळी नगरपालिकेतील भाजप गटनेते तुकाराम साबळे, भाजप जिल्हा सचिव शरद कदम उपस्थित होते. राजू गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून विनिता कांबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी ते राष्ट्रवादी पक्षाची मनधरणी करीत आहेत, परंतु या चर्चेदरम्यान अद्याप युतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपला विश्वासात घेत नसल्याबद्दल श्रीकांत पुरी यांनी आश्चर्य व्यक्त केले व स्थानिक शिवसेना नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply