Breaking News

उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले प्रभागातील विविध विकास कामांची पाहणी

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आज प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात रस्ते, नाले, गटार दुरुस्तीची कामे, डागडुजीची कामे, सिमेंटचे रस्ते, डांबरीकरण आदींची कामे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. या संदर्भात आज त्यांनी सदर कामांची पाहणी केली. कामाचा दर्जा, तसेच वापरण्यात आलेली सामग्री याची पाहणी केली. या संदर्भात ज्या ठिकाणी त्यांना कामचुकारपणा आढळला त्यासंदर्भात त्यांनी तत्काळ संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन कामाचा दर्जा चांगला ठेवण्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रभागातील नागरिकांशी सुद्धा सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व काही अडचणी तत्काळ पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून सोडविल्या.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply