Breaking News

उरणच्या कोविड सेंटरमधील डॉक्टर, कर्मचार्‍यांना वैद्यकीय साहित्याचे वाटप

उरण : रामप्रहर वृत्त

स्व. उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या सोमवारी (दि. 17) होणार्‍या नवव्या स्मृतिदिनानिमित्त उरण बोकडवीरा येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्‍या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व कोविड पेशंट यांच्यासाठी पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज असे वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. उरण आवरे येथील ऊर्मिला रमेश म्हात्रे व त्यांचे पती रमेश भास्कर म्हात्रे यांच्यामार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इटकरे आणि डॉ. स्वाती म्हात्रे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. या वाटपाच्या वेळी  उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, तसेच संतोष पवार, सुनील भोपतराव, नरेंद्र पाटील, आदित्य भगत, योगेश कडू आदी उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply