उरण : वार्ताहर
मध्य प्रदेशातील इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जलतरणामध्ये तीन स्पर्धकांनी नऊ सुवर्णपदके जिंकली. या तीनही स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या माध्यमातून इंदौर येथे सातव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळांंचा समावेश होता. यातील जलतरणामध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश मोडखरकर आणि जयदीप सिंग यांनी सहभाग घेत पदकांची लयलूट केली. यातील आर्यन मोडखरकरने 50 मी. बटरफ्लाय स्ट्रोक, 50 मी. फ्रिस्टाईल आणि 100 मी. फ्रिस्टाईल या तीन प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. हितेश भोईरने 50 मी. फ्रिस्टाईल, 100 मी, फ्रिस्टाईल आणि 100 मी. बॅकस्ट्रोक या प्रकारांत तीन सुवर्णपदके पटकाविली, तर जयदीप सिंगनेही 50 मी. फ्रिस्टाईल, 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक आणि 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारांत सुवर्णपदके जिंकली. या तिघांचेही कौतुक होत आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper