उरण : वार्ताहर
शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (दि. 26) सकाळी गणपती चौक येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उद्योगपती अशोक बालदी, हस्तीमल मेहता, पुरुषोत्तम सेवक, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, आकाश शाह, विशाल पाटेकर, गोपाळ कुमावत, स्वप्नील रावते, अभिषेख जैन, जिगर ठक्कर, विष्णू सेवक, संतोष साळवी, नवीन जैन, नवीन कोटक, रौनक सेवक, बाबूलाल शाखला, चंद्रप्रकाश मेहता, सुरेश, दिगंबर, संघाचे कार्यकर्ते व व्यापारी असोशिएशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper