उरण : वार्ताहर
मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण आयोजित आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्यविषयी मार्गदर्शन शिबिर सोमवारी (दि. 14) आयोजित करण्यात आले होते.
उरण-बोरी दत्ता रहाळकर मैदान येथे झालेल्या या शिबिरात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षितता रेश्मा परब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या शिबिरात योगासने, ध्यान धारणा, प्राणायाम, मंत्रजप, भजन व महिलांचे व आहार चर्चासत्र आदी महिलांचे आरोग्य कसे संपन्न राहील यावर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, सामिया बुबेरे, मधुरा कंरगुटकर, प्रेरणा पाटील, सुमेध पाटील, योगराज कंरगुटकर, बादल म्हात्रे, पुनम पाटेकर (प्रोपा. दुर्वा एंटर प्रायझेस), सायली पाटेकर, विकास पाटेकर, प्रणय अमृते आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper