Breaking News

उरणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

उरण ः प्रतिनिधी

रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज, रत्नागिरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात 54 हजार रक्त बाटल्या जमा करण्याचा संकल्प करीत दि. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2019 दरम्यान रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून उरणमध्ये नरेंद्र महाराज यांच्या श्री संप्रदायतर्फे  दि. 2 ऑक्टोबर रोजी पीरकोन व नवघर येथे, दि. 6 ऑक्टोबर रोजी सोनारी येथे तर दि. 13 ऑक्टोबर चिरनेर व एन. आय. हायस्कूल उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सिकलसेल, एनेमिया, हिमोफेलिया, थेलेसेमिया, ब्लड कॅन्सर, कीडनी फेल्यूलर पेशंट जास्त प्रमाणात आढ़ळतात. दि. 2 ऑक्टोबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पीरकोन येथे होणार्‍या रक्तदान शिबिसाठी जयेश पाटील- 9930273429, याच दिवशी नवघर येथे जिल्हा परिषद शाळेत होणार्‍या रक्तदान शिबिरासाठी अशिष बंदा- 8779691316, 6 ऑक्टोबर रोजी गणपती मंदिर सोनारी येथे होणार्‍या रक्तदान शिबिराविषयी दिपाली पाटील- 8097677418, दि. 13 ऑक्टोबर 2019 रोजी पी. पी. खारपाटील सोसायटी चिरनेर येथे होणार्‍या रक्तदानासाठी प्रणिल ठाकूर-9004200681, तसेच दि. 13 ऑक्टोबर 2019 रोजी एन. आय. हायस्कूल, नगर परिषद समोर उरण येथे होणार्‍या रक्तदान शिबिरासाठी सुभाष भोसले-9223505249 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply