उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपयशी ठरल्याने उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. उरण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाच कार्यकर्त्यांचा ग्रुप करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन आपआपल्या घरा जवळ काळे फीत लाऊन, निषेधाचे फलक दाखवुन राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनी हातामध्ये विविध फलक हातात धरून निषेध केले. त्या फलकात असे लिहिले होते की उद्धव मात्र भाषण ठोकतो, डरोना…डरोना…..पण रोखता येईना… कोरोना…कोरोना, कोरोना संकट होतय फारच गडद, गोरगरीब जनतेला सोडलय वार्यावर उडत.., महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार आपल्या घरत…, हातात वाडगे केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझ्यात खोट…, ठाकरे सरकार हाय…हाय…,उद्धवा..अजब तुझे निष्कळ सरकार…, कोरोनाच्या संकटाला, जबाबदार ठाकरे सरकारचा, भोंगळ कारभार…,कोरोना रोखण्यात पूर्ण निष्फळ..उद्धव सरकारचा धिक्कार असो…अशा प्रकारचे फलक दाखऊन कार्यकर्त्यांनी निषेध केला.
उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय जवळ आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर भाजपा अध्यक्ष कौशिक शाह, उपनगराध्यक्ष जयविन कोळी यांनी फलक दाखवुन राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, सविन म्हात्रे, कुंदन रवैया, संदीप कोळी, नगरसेवक राजेश ठाकूर यांनी उरण कुंभारवाडा येथे निषेध व्यक्त केला.तसेच उरण शहर युवक अध्यक्ष निलेश पाटील, कार्यकर्ते सागर मोहिते, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, गौरव कोळी, देवेंद्र घरत, शहरातील बालई विभागातील हेमंत भोंबले, वासुदेव माळी, महेश माळी, राकेश पाटील, योगेश म्हात्रे, अमित म्हात्रे, प्रतिक माळी, सिद्येश माळी, मनीष माळी, प्रीतेश पाटील, भारत पाटील, राजेश म्हात्रे चाणजे (तेलीपडा) विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, अजय म्हात्रे, सुहास पाटील, संतोष रत्ने, मंगेश म्हात्रे आदींनी तेलीपाडा येथे निषेध व्यक्त केला. नवघर गावातील भाजप कार्यकर्ते शेखर तांडेल, राजेश पाटील, मंगेश भोईर, अमित जोशी, रुपेश भोईर आदींनी निषेध व्यक्त केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper