पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील आवरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
पनवेल येथे रविवारी (दि. 10) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, सुनील पाटील, आवरे गाव पक्षाध्यक्ष बाळा गावंड, उपसरपंच धनेश गावंड, युवा नेता हरिश्चंद्र गावंड, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
या वेळी आवरे गावातील शेकाप कार्यकर्ते साईनाथ गावंड, संजय गावंड, सुधीर गावंड, परेश म्हात्रे, विकास गावंड, धर्मेंद्र गावंड, कल्पेश गावंड, संदेश गावंड आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper