Breaking News

उरण विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीचा आढावा

उरण : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघ येथील रा.जि.प. मराठी शाळा जासई येथे आचार संहिता पथक, खर्च नियंत्रण समिती व इतर समित्यांचे नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयक तयारी व कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. 24) आढावा घेतला.

या वेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक विषयक सर्व कामकाजांची तयारी झाली आहे. त्या अनुषंगाने उरण विधानसभा मतदारसंघात 327 मतदान केंद्र असून ते एकूण 174 स्थानांच्या ठिकाणी आहेत.   या मतदारसंघात एकूण दोन लाख 92 हजार 951 इतके मतदार असून, पुरुष मतदार संख्या एक लाख 47 हजार 198 व स्त्री मतदार संख्या एक लाख 45 हजार 650 व इतर तीन मतदार आहेत. निवडणुकीचे काम नोडल अधिकारी व कर्मचार्‍यांनी पारदर्शक, नियोजनबद्ध व निःपक्षपातीपणे करावे.क्षेत्रीय अधिकारी यांनी वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदानासाठी निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात येणार्‍या सुविधांविषयी माहिती देऊन त्यांचे जास्तीत जास्त मतदान होईल ते पाहावे.  मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. या वेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील, तसेच नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply