सिडको वृत्त – आज (दि. 29) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील उलवे नदीच्या परिवर्तीत चॅनलची सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पाहणी केली. उलवे नदीच्या 3.2 कि.मी. लांबीच्या परिवर्तित केलेल्या चॅनेलचे कार्यान्वयन कशाप्रकारे होत आहे, याची पाहणी लोकेश चंद्र यांनी यावेळी केली. उलवे नदीचा प्रवाह वळविण्याचे काम सिडकोतर्फे नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. या प्रसंगी मुख्य अभियंता (नमुंआंवि) आर. बी. धायटकर, अधिक्षक अभियंता विमानतळ-3 प्रणित मूल पी. डी. काटकर, श्री. भरणीकुमार (मे. टीआयपीएल-जेएमएम जेव्ही) आणि श्री. दादासाहेब सूर्यवंशी (मे. केतन कन्स्ट्रक्शन हेही उपस्थित होते.
Check Also
शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे
भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …
RamPrahar – The Panvel Daily Paper