केपटाऊन ः वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी (दि. 23) झालेल्या तिसर्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघात ऋतुराज गायकवाड याला संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या दोन सामन्यांत भारताचा सहज पराभव झाल्यामुळे तिसर्या सामन्यात काही बदल अपेक्षित होते. त्यानुसार भारताने तिसर्या सामन्यासाठी चार महत्त्वाचे बदल केले. सूर्यकुमार यादवला व्यंकटेश अय्यरच्या जागी, जयंत यादवला रविचंद्रन अश्विनच्या जागी, प्रसिद्ध कृष्णाला भुवनेश्वर कुमारच्या जागी, तर दीपक चहरला शार्दुल ठाकूरच्या जागी संघात स्थान देण्यात आले, मात्र ऋतुराज गायकवाडला संघात एकाही सामन्यासाठी संधी देण्यात न आल्याने अनेकांनी कर्णधार केएल राहुलला धारेवर धरले.
RamPrahar – The Panvel Daily Paper