Breaking News

एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धेची रविवारी पनवेलमध्ये रंगणार अंतिम फेरी

अभिनेते पृथ्वीक प्रताप, भरत साळवे यांची लाभणार उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी (दि.  28) पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे.
सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांची, तर सन्माननीय अतिथी म्हणून अभिनेते पृथ्वीक प्रताप, भरत साळवे यांची उपस्थिती असणार आहे.
आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांचे आयोजन केले जाते. ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ असे ब्रीद घेत अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करून कलाकारांच्या आविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या नाट्य संस्था यात सहभागी होतात. त्या अनुषंगाने आयोजित एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply