Breaking News

एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पनवेल : बातमीदार

कळंबोलीतील सेंट्रल फॅसिलिटीज इमारतीत असलेल्या सिंडिकेट बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी पहाटे घुसलेल्या एका लुटारूने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा

शोध सुरू केला आहे. चोराने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला मशीन फोडता आले नाही. सकाळी 11.30च्या सुमारास एटीएममध्ये आलेल्या ग्राहकाने एटीएम बंद असल्याची माहिती दिली. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक देवाशिष मिश्रा यांनी पाहणी केली असता एटीएम मशीनचा रोख रक्कम टाकण्यासाठीचा असलेला दरवाजा वाकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे मिश्रा यांनी एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पहाटे डोक्यात हेल्मेट व अंगात काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये घुसल्याचे तसेच त्याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी पहारीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply