Breaking News

एपीएम टर्मिनल्सतर्फे नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पिटलला रुग्णवाहिका

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

एपीएम टर्मिनल्स मुंबईने त्यांच्या सीएसआर फंडातुन नवी मुंबईतील वाशी येथील एमजीएम हॉस्पिटला रुग्णवाहिका सुपूर्द केली. या रुग्णवाहिकेेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

या रुग्णवाहिकेचा उपयोग उरण, पनवेल, सानपाडा, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे, घणसोली भागातील जवळच्या रुग्णांना होईल. या मदत करण्याच्या हेतूने रुग्णवाहिका  देण्यात आली आहे. वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात पोहचणे बेसिक लाइफ-सपोर्ट-सिस्टिम, अनालॉग  ऑक्सिजन डिलीव्हरी सिस्टीम्स आणि फ्लोअर माऊंटिंग मेकॅनिझमसह ऑटोलोडर स्ट्रेचर ट्रॉली यासह जीवनरक्षक उपकरणे असलेली रुग्णवाहिका सुसज्ज आहे.

लोकार्पण सोहळ्याला एपीएम टर्मिनल्स मुंबईचे प्रमुख-एचआर अँड ईआर सुनील सुजी, एजीएम ऍडमिनिस्ट्रेशन दर्शन सगदेव, संचालक डॉ. कल्याणी सेन, वैद्यकीय संचालक डॉ. नितीन कदम, हेड ऑफ मार्केटिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिन अक्षय कुमार झा, एमजीएम हॉस्पिटलच्या व्यवस्थापक आणि ऍडमिनिस्ट्रेशन गीतांजली शेट्टी  आदी उपस्थित होते.

बंदराने रुग्णवाहिकेची वैयक्तिक खरेदी सुरू केली आणि ती रुग्णालयाकडे सुपूर्द केली आहे. एमजीएम रुग्णालयाच्या वतीने रुग्णवाहिकेचे मेंटेनन्स आणि देखभाल केली जाईल.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply