नंदुरबार : प्रतिनिधी
शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार हे अपयशी ठरले आहे, पण देशातील एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणार्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणार्या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले आहे, तर दुसरीकडे एफआरपीचे तीन तुकडे आणि सध्या सुरू असेलेली वीज तोडणी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे. वेळप्रसंगी कायदा हातामध्ये घेऊ पण शेतकर्यांच्या प्रश्नी लढा कायम असल्याचेही त्यांनी नंदुरबार येथील ऊस परिषदेमध्ये सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper