पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व तुकाराम नारायण घरत (टीएनजी) कनिष्ठ महविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभास वसंतशेठ पाटील, अजय भगत, हेमलता भगत, विजय घरत, रघुनाथशेठ देशमुख, वामन म्हात्रे, श्रीकांत घरत, जयवंत देशमुख यांच्यासह विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नृत्य तसेच कवायतींचे प्रकार सादर करून संदेश दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper